Tuesday 20 November 2018

Sochta hu...!!!

Ye soch hi hamari jindagi badal deti hai...
Hamein rasta dikhati he...
Jimmedari uthane ka mauka deti he...!

Is soch ke bhi kae rup he...
humein rup chunne ka mauka deti he...!
Kehte he sabki soch ek jaisi nahi hoti...
Par ek sahi soch sabko milane me jut jati he...!

A musafir,
Dusro ke kehne pe mat ja...
Khudki soch par bharosa karna sikh le...!
Ye duniya jo rah dikhati he...
Kae bar...wohi hamein piche khich lati he...!

A dost,
Us soch ko aage badana...
Warna soch soch reh jaegi aur samay nikalta chala jaega...!

Bas yahi sochta hu ki...
Us soch ka najariya sahi rakhna...
Manzil apne aap dikhti chali jaegi...!

-Rahul

Sunday 2 October 2016

Lost

कुठे हरवलो कधी कळलच नाही
बालपणाच्या आठवणी सोबत ठेवत आलो
कसा जगावं ह्या विचारात वाढत गेलो...
वेळ कसा पळाला कधी कळलच नाही 
कधी सगळे वेगळे झालो कळलच नाही...
कुठे हरवलो...कधी कळलच नाही...!!!
आई वडिलांच्या स्वप्नांसाठी जगत आलो
कधी घर सोडाव लागणार असा विचार आलाच नाही...
आईच्या हातच जेवण मिळणार नाही
असा मनात आलच नाही...
मोठं व्हायच्या नादात...
कुठे हरवलो...कधी कळलच नाही...!!!
सुख मिळावं म्हणून धडपड करत आलो
कितीही कमवलं तरी कमी पडत गेलं...
मित्रता जपण्याचा प्रयत्न करत गेलो
प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवत गेलो...
कुठे हरवलो ह्याचा विचार करत गेलो...!!!
कोणी तरी आपलं मिळेल म्हणून वाट बघत गेलो
Someone special साठी surprise plan करत गेलो...
आईच प्रेम पुरेसं होत...जगण्याची हिम्मत देत गेलं...
पण...स्वप्नांसाठी कुठे हरवलो ह्याचा विचार करत आलो...
                                           
                                           -राहुल विनायक मोजाड

Bappa

कुठे चुकलो कळेनासं झालंय...
विचार करून थकल्या सारखं झालंय...
कामाच्या दुनियेत मिसळून गेलोय...
अचानक झालेले गोष्टी...विसरत चालतोय...
अपेक्षा करत गेलो...पूर्ण होत नाही म्हणून त्रास सहन करत गेलो...
मनावर दगड ठेवत गेलो...
माझी चुकी समजत गेलो...
माझ्या सोबतचं असा का होत...याचा विचार करत आलो...
ए बाप्पा...
जाता जाता सांग तरी कुठे चुकत आलो...
पुढच्या वर्षी तुझी येण्याची वाट बघत राहील...
पुन्हा त्या चुका होणार नाही...याची...मी खात्री करून देईल...
अचानक आलास अन अचानक चाललास...
कामाच्या भानात कळलंच नाही...
रागवला असेल तर माफ कर राजा...
पुढच्या वर्षी नक्की तुजा स्वागताला तयारीत राहील...
तुझे आशीर्वाद आम्हांस लागो...हिज तुझ्या चरणी प्रार्थना...
मोरया मोरया...गणपती बाप्पा मोरया...
पुढच्या वर्षी लवकर या...!!!
                                                                  - राहुल

When ?

मनात हजारो उलगडणारे प्रश्न...
उत्तर शोधणार तरी कधी...?
मोकळे पणा, जाणवणार तरी कधी...
मी स्वताला ओळखणार तरी कधी...?

जगण्याची परीभाषाज वेगळी...
जीवनाला ओळखायचं तरी कधी...?

आपलं कोण...? याची जाणीव होणार तरी कधी...
एकटे पणा दूर होणार तरी कधी...?

वाट बघण्याची क्षमता अमलात आणायचं तरी कधी...
आई वडिलांचे उपकार फेडणार तरी कधी...?

जबाबदारी समजणार तरी कधी...
स्वताची वाट शोधणार तरी कधी...?

कर्म करायची हिम्मत करणार तरी कधी...
पैसेचा विचार न करता...राहता येईल का कधी... 

या सगळ्या गोष्टींची जाणीव होणार का कधी...
हे सगळं करण्यासाठी  "पण" घेणार मी कधी...

चांगला माणूस बनून दाखवणार आधी...!!

Anger

इतका कसला राग मला... कसं आवरू मी ह्याला...

नकळत काही पण बोलून जातो... मग नंतर सॉरी सॉरी म्हणतो...

मना सारखं नेहमी होणं शक्य नाही... पण हे मला समजत नाही...

कसं सांगू मी ह्या रागाला मला तू आवडत नाहीस...

अन त्याला पण मला त्रास दिल्या शिवाय राहवत नाही...

भरपूर गोष्टी लांब होत गेले... वाटलं तरी जवळ ठेवता आले नाही...

चीड चीड स्वभाव होत गेला... त्याला अवर्ण शक्य नाही...

शांत का राहू देत नाही... त्याला पण माझी छेड काढल्या शिवाय राहवत नाही...

आवडत्या गोष्टी मध्ये वेळ घालवत गेलो...रागाला ते बगवल नाही...

त्रास देण्याचा अजून प्रयत्न करत गेला... आता माझ्या वर त्याचा काहीच फरक पडत नाही...

राग... रागात बघू लागला... अन माझ्या पासून दूर जाऊ लागला...

हसण्याचे अनेक कारण मिळत गेले...चीड चीड स्वभाव कमी होत गेला...

राग... रागात पळून गेला...!!!

-       राहुल



Writer's PEN

कलम माझ्या कडे बघू लागला
काही लिहणार का... विचारू लागला ?
हसत हसत माझ्या कडे वळू लागला
माझा उपयोग तर कर बोलू लागला...

मी पण... काय लिहू याचा विचार करू लागलो
आजू बाजूला बघू लागलो...
काहीच सुचेना म्हणून कलम कडे वळालो...

त्याच्या कडे बघून हसत म्हणालो...
कितिरे बावरा तू... दुसऱ्यांना कामाला लावतो...
स्वतः आरामात राहतो...

कलम हसू लागला...अन म्हणाला...
तुला पण शेवटी माझीच गरज पडते
एकठा असला कि माझीच आठवण येते
मन मोकळं करायला माझीच साथ लागते...

तुज माझा खरा मित्र...मी बोलू लागलो
कलमला मिठी मारू लागलो...

लाजून चेहरा लवपू लागला...
काही तरी लिह परत Tont मारू लागला

ह्याच कवितेचा माझ्या मनात विचार येऊ लागला...
अन कलम माझ्या कडे बघू लागला...
       
                                     - राहुल विनायक मोजाड

Enjoy the Colours of Life